झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘पाहिले न मी तुला’ या मालिका सध्या नवनवीन व्टिस्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यातील पात्रं, त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. आता या दोन मालिकांचे क्रॉस कनेक्शन झाले आहे. म्हणजे नेमकं काय झालं? तर झालं असं की या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले हे तिघंही एकत्र आलेत. नुकतेच अन्विताने तिच्या सोशल मिडीयावर शशांक आणि तन्वीसोबतचे काही फोटो शेअर केलेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnvitaPhaltankar #YeuKashiTashiMiNandayala #PahileNaMiTula
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber